Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा सुरू झालेला कर्नाटक वाद (Maharashtra karnataka seemawad) शांत होण्याचे नाव घेत नसताना एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर यांनी महाराष्ट्रातील १५० गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute)

 

उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका (Petition) सतीष विडोळकर यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. या १५० गावांपैकी नांदेड जिल्ह्यातील २५ गावे तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाण्यातील ४ गावांनी मध्य प्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे, तर चंद्रपूरच्या सीमाभागातील १४ गावे तेलंगणात जाऊ इच्छितात.

सर्वोच्च न्यायालयाने १९९७ मध्ये चंद्रपूरच्या गावांचा निकाल महाराष्ट्राच्या बाजूने दिला आहे.
नाशिकमधील काही गावांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही गावे कर्नाटकात जाऊ इच्छितात.
या गावांनी दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना सुविधा द्याव्यात,
यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात ॲड. राजसाहेब पाटील, ॲड. विजय खामकर, ॲड. तुषार भेलकर आणि
ॲड. सुप्रिया वानखेडे याचिकाकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Karnataka Border Dispute | intervention petition filed in supreme court by satish vidolkar and shivaji maharaj swarajya mission on maharashtra karnataka border dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई