Maharashtra Kesari | मुंबई पोलीस शिपायाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी, पुण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याच्या विरोधात चार गुण दिल्याने पंच मारुती सातव (Maruti Satav) यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील शिपाई संग्राम कांबळे (Sangram Kamble) यांनी फोन करुन सातव यांना धमकी दिली. याप्रकरणी सातव यांनी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर समितीने पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) संग्राम कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal police station) पोलीस शिपाई संग्राम कांबळे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संग्राम कांबळे आणि मारुती सातव यांच्यात फोनवर झालेले संभाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान, कांबळे यांनी सातव यांना धमकी दिली नसल्याचे पैलवान सिकंदर शेख याने म्हटले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (Maharashtra Kesari) माती गटाच्या अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला पंचांनी चुकीच्या पद्धतीने चार गुण दिले. हे सिकंदर शेख याच्यावर झालेला अन्याय असल्याची भावना सोशल मीडियावरुन व्यक्त होत आहे. यामध्ये पंच मारुती सातव यांची चूक असल्याचे म्हटले जात आहे. अंतिम लढतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिकंदरवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे.

 

याप्रकरणी पोलीस शिपाई संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करुन धमकी दिल्याची तक्रार पंच सातव यांनी दिली आहे. सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला असून याप्रकरणी समितीकडून कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्यातील महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये उपांत्य समना जाला.
यामध्ये गायकवाड याने दुसऱ्या फेरीत चार गुण मिळवत सिकंदर याच्यावर 5-4 अशी आघाडी घेतली.
मात्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नाही.
मग महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
याचाच जाब विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना फोन करुन
धमकी दिल्याचा आरोप पंच सातव यांनी केला आहे.

 

Web Title :- Maharashtra Kesari | maharashtra kesari tournament referee threatened by constable of mumbai police force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी