Maharashtra Kesari Wrestling Tournament | पुण्यात ७ नोव्हेंबरपासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा, विजेत्यांना मिळणार महिंद्रा थार, ट्रॅक्टर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Kesari Wrestling Tournament | फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान रंगणार आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला महिंद्रा थार जीप बक्षीस देण्यात येणार आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीपटूला ट्रॅक्टर बक्षीस दिले जाईल. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Maharashtra Kesari Wrestling Tournament)

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके आणि विलास कथुरे उपस्थित होते. प्रदीप कंद यांनी म्हटले की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये होईल. (Maharashtra Kesari Wrestling Tournament)

स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये ५० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडीयम उभारण्यात आले आहे.

प्रदीप कंद यांनी सांगितले की, या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि ६ महानगरपालिका
असे एकूण ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १०
आणि माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक
असे एकूण २३ जणांचा सहभाग असणार आहे.

या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक,
८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hardik Pandya | हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट, वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर म्हणाला – ‘ही गोष्ट फार जड जाईल’

Pune SPPU News | पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या राडयानंतर परिसरात सुरक्षेत वाढ, विद्यापीठ प्रशासनाचा मोठा निर्णय