Maharashtra Legislative Council Election 2022 | ‘विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाचे 3 आमदार 21 कोटी रुपयांना फुटले’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Legislative Council Election 2022 | विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार 21 कोटी रुपयांमध्ये फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला 7 कोटी रुपये दिल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात मिटकरी बोलत होते. (Maharashtra Legislative Council Election 2022)

 

आम्हालाही इतर पक्षांकडून ऑफर
सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर 20 लाख रुपये येतील. मात्र इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते (Group Leader) पदाची ऑफर देण्यात आली आहे. याबदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊ, अशी ऑफर आल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला. (Maharashtra Legislative Council Election 2022)

 

दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) टिकणार नसल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. दीड महिन्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मिटकरी विरोधकांकडून ट्रोल
नेमकं मिटकरींचे गणित चुकले आणि विरोधकांनी त्यांना ट्रोल केले.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मिटकरींच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं
की, जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी यांची नोबेल पारितोषिकासाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Maharashtra Legislative Council Election 2022 | three mlas of one party split for rs 21 crore in legislative council elections said ncp mla amol mitkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

 

Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

 

Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल