Maharashtra Legislative Council Elections 2022 | विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट ! भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Legislative Council Elections 2022 | राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) आणि विधान परिषद निवडणूकीच्या (Maharashtra Legislative Council Elections 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नावाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर पंकजा यांना विधान परिषद उमेदवारीवरुन डावलण्यात आलं आहे. (Maharashtra MLC Elections 2022)

 

भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन भाजपने सर्वांनाच एक झटका दिला आहे.

 

विधान परिषदेसाठी भाजपची यादी –

– प्रवीण दरेकर

– प्रसाद लाड

– श्रीकांत भारतीय

– राम शिंदे

– उमा खापरे

 

Web Title :-  Maharashtra Legislative Council Elections 2022 | maharashtra mlc election 2022 bjp announced name of 5 candidates big jolt for pankaja munde as name not in list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत; ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी होणार

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण