Manoj Jarange Patil | मंत्रीच कायदा, सुव्यवस्था बिघडवतायत, भुजबळ-राणेंना सरकारचे पाठबळ, जरांगेंनी व्यक्त केला संशय

जालना : Manoj Jarange Patil | मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. भुजबळांना (Chhagan Bhujbal) सरकार रोखत नाही. नारायण राणेही (Narayan Rane) टीका करत आहे. सरकारचे त्यांना पाठबळ असल्याचा संशय आम्हाला आहे, असे वक्तव्य मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. जरांगे यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा उत्तर महाराष्ट्रात होत आहे याबाबत ते बोलत होते. दरम्यान, आज जरांगे यांची जालना येथे भव्य सभा होत असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange Patil)

जालन्याच्या सभेपूर्वी येथे जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सभा होणारच. पाऊस म्हणजे आम्हाला आशीर्वाद आहे. मुसळधार पाऊस असो की कडक ऊन असो, मराठे सभेला येणार आहेत. सभा यशस्वी होणार. (Manoj Jarange Patil)

जालन्यातील सभेपूर्वी मनोज जरांगे यांची शहरातून भव्य रॅली निघणार आहे. यावेळी १३० जेसीबीमधून मनोज जरांगे
यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाईल. या फुलांचा वर्षाव करण्याच्या कृतीवर विरोधकांनी टीका केली आहे. याबाबत जरांगे म्हणाले, मराठा समाजातील ३२ लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या. म्हणजे मराठा समाजातील ३२ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. त्यांना आरक्षण मिळाल्याच्या आनंदामुळे पुष्पवृष्टी केली जात आहे. फुले उधळली जात आहेत. त्यांना हे दिसत नाही का? तुझे डोळे गेले का?

सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेबाबत मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांचे दोन, चार लोकच हे काम करत आहे.
भुजबळ आणि विरोधक जे काही बोलत आहे, त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. आम्ही बोललो नाही तर हे कोमात जातील.
त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशावरुन जमीन नावावर करण्यासाठी लाचेची मागणी, रक्कम स्वीकारताना तलाठी व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक