Maharashtra MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : Maharashtra MLA Disqualification Case | शिवसेना आमदार (Shivsena MLA) अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची उलट तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. सुनावणीत ठाकरे गटाने खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. याबाबत ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. (Maharashtra MLA Disqualification Case)

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला ४ एप्रिल २०१८ रोजी दाखल केलेल्या पत्रावर सुनील प्रभू यांच्या उलट तपासणी दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर ठाकरे गटाने हे पाऊल उचलले आहे. (Maharashtra MLA Disqualification Case)

ठाकरे गटाने अध्यक्षांना पत्र लिहून विनंती केली आहे की, अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या घटनेत झालेली दुरुस्ती
आणि पक्षप्रमुख पदाला दिलेले सर्व अधिकार याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेनंतर पाठवली आहे. त्यामुळे हे सगळे रेकॉर्डवर आणण्यासाठी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान बोलवावे आणि या कागदपत्रांची छाननी करावी.

ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगात या सर्व प्रकरणातील सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी
दिलेल्या उत्तराची मूळ प्रत रेकॉर्डवर आणली जावी. अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या आधीच्या
पत्रावर आक्षेप घेत अशा प्रकारचे कुठलेही पत्र निवडणूक आयोगाला तसेच याचिकेदरम्यान सादर झाले नसल्याचे म्हणणे
शिंदे गटाने उलट तपासणी करताना अध्यक्षांसमोर मांडले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया