Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : Ajit Pawar On Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या चारही जागा आमचा गट लढवणार असल्याचे अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलताना जाहीर केले आहे. अजित पवार यांची ही घोषणा एक प्रकारे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना दिलेले आव्हान आहे. याबाबत आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar On Baramati Lok Sabha)

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी नागरिक आहे. लोकशाहीत एखाद्या पक्षाला कुठून लढायचे आहे, हा त्यांचा अधिकार आहे. (Ajit Pawar On Baramati Lok Sabha)

खासदार सुळे म्हणाल्या, आमची नाती आणि आमचे प्रोफेशन वेगळे आहे. या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते. लोकशाहीत कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच. त्यामध्ये गैर काय? कोणीतरी लढलेच पाहिजे, असा माझा आग्रह राहणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे. कोण योग्य आहे, हे बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता ठरवेल.

कर्जत येथील पक्षाच्या शिबीरात बोलताना अजित पवार यांनी आणखी एक दावा केला, तो म्हणजे, आम्ही
भाजप-शिवसेनेसोबत राज्य सरकारमध्ये सामील होण्याआधी देवगिरी बंगल्यावर नेत्यांची एक बैठक झाली होती.
या बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांनी मला निर्णय घेण्यासाठी सात दिवसांचा वेळ हवा आहे, असे म्हटले होते.

यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला त्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, म्हणून मी तिथून बाहेर पडली होती.
मात्र त्यांचा जो प्रस्ताव होता त्यावर निर्णय घेण्याबाबत बाबांसोबत चर्चा करण्यासाठी मला सात दिवस द्या,
असे मी त्यांना सांगितले होते.

दरम्यान, पक्षाच्या कर्जत येथील शिबीरात अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत.
बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा मतदारसंघात आपण निवडणूक लढवणारच आहोत.
तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथे खासदार आहेत, त्या काही जागा मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करणार आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, चाकण परिसरातील घटना

कुटुंबाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, चार जणांवर FIR; दापोडी परिसरातील घटना

पिंपरी : विनयभंग करुन पतीला मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड; आरोपी गजाआड

Maharashtra MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गटासाठी सामंत, केसरकर यांची साक्ष महत्त्वाची, अधिवेशन काळातही सुनावणी