Maharashtra Monsoon Updates | महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 15 जूनपर्यंत ’या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Updates | राज्यात मान्सूनने हजेरी लावली आहे. 15 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनाही हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकणात पावसाची तीव्रता अधिक असेल. मान्सून दाखल होत असतानाच केरळ उत्तर कोकण किनारपट्टीवर ढग जमा झाले आहेत. (Maharashtra Weather Alert)

 

हवामान विभागाने मुंबईत येलो अलर्ट दिला आहे. तसेच 12 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. 13 जून रोजी कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. 14 जुलैला विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. )Maharashtra Monsoon Updates)

 

15 जूनला मात्र पावसाची मोकळीक पाहायला मिळेल मात्र या दिवशी मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

 

Web Title :-  Maharashtra Monsoon Updates | maharashtra monsoon updates weather alert extremely torrential rains in the state alert to till 15 june

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा