Maharashtra Municipal Election 2022 | पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुक ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच होण्याची चिन्हे ! पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, कल्याण- डोंबवलीची निवडणूक होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Election 2022 | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुढील दोन आठवड्यांत स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश दिल्याने महापालिका (Municipal Corporation) व जिल्हा परिषदांच्या (Zila Parishad) निवडणुका केंव्हा होणार? याची उत्सुकता वाढली आहे. याबाबत येत्या एक दोन दिवसांत राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देश आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार असली तरी अधिकारी वर्गाकडून जूनच्या तिसर्‍या आठवड्यात निवडणुका होतील, असा सूर दिसून येत असून राजकिय पक्षांच्या मते पुणे Pune Municipal Corporation (PMC), मुंबई Brihanmumbai Municipal Corporation (BMC), नागपूर (Nagpur), नाशिकसह (Nashik) नुकतेच बरखास्त झालेल्या महापालिकांमध्ये पावसाळयाच्या पार्श्‍वभूमीवर ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये निवडणुका होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra Municipal Election 2022)

राज्यातील औरंगाबाद (Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur), वसई विरार (Vasai Virar), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि कल्याण डोंबविली Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) या महापालिकांचा कार्यकाळ संपून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. कोरोना पेंडामिकमुळे यापैकी बहुतांश महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. तर मागील महिन्यांत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे यासह मोठ्या दहा महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. ओबीसी आरक्षणामुळे याठिकाणी वेळेत निवडणुका होउ न शकल्याने प्रशासक नेमण्यात आले आहेत. परंतू सर्वोच्च न्यायालयाने आज आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला पुढील दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. (Maharashtra Municipal Election 2022)

स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये पेंडामिक वगळता अन्य परिस्थितीत सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, मार्चमध्ये बरखास्त झालेल्या मुंबई पुण्यासह दहा महापालिकांमध्ये उर्वरीत पाच महिन्यांत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. या शहरांची नगरसेवकांची संख्या, मतदारांची संख्या याचा विचार करून निवडणुकीसाठी व्यापक नियोजन करावे लागणार आहे. अशातच पावसाळ्यामध्ये येणार्‍या संभाव्य अडचणींचा विचार करून ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये निवडणुका होतील, असा अंदाज अधिकारी व राजकिय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

 

तर एक वर्षांहून अधिक काळापुर्वी बरखास्त झालेल्या कोल्हापूर, नवी मुंबई, औरंगाबादसह पाच महापालिकांमध्ये जूनमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा सूर राजकिय वर्तुळात आहे.

 

नुकतेच बरखास्त झालेल्या महापालिकांची निवडणूक पावसाळ्यानंतरच – वडेट्टीवार

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश हे सहा महिन्यांहून अधिक काळ प्रशासक असलेल्या ५ महापालिकांसाठी लागू आहेत.
उर्वरीत सर्व महापालिकांच्या निवडणुका या पावसाळयानंतरच होणार आहेत.
न्यायालयाच्या निकालानुसार प्रभाग पुर्नरचनेचे राज्य सरकारने घेतलेले अधिकार पुन्हा राज्य निवडणुक आयोगाकडे जातील (Maharashtra State Election Commission).
गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होईल आणि पुढील प्रक्रिया पार पडेल,
असे राज्याचे इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Municipal Election 2022 | Signs that Pune, Pimpri Chinchwad Municipal Corporation
elections will be held in August-September only! In the first phase, elections will be held in Navi Mumbai, Kolhapur, Aurangabad, Kalyan-Dombavali

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा