Maharashtra NCP Crisis | जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं, सुनील तटकरेंकडे जबाबदारी; प्रफुल्ल पटेल यांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9 आमदारांवर अपात्रतेची (MLAs Disqualification) कारवाई करण्याची याचीका दाखल केली आहे. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना प्रदेशाध्यक्ष (State President) पदावरून हटवलं असून त्यांच्या जागी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra NCP Crisis)

 

अजित पवार, प्रफुल्ल पटेल (Praful Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. (Maharashtra NCP Crisis)

 

प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सरकारमध्ये सामील झालो. आज काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काल काही नियुक्ती केली आहे. मागच्या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत अधिवेशन झाले त्यामध्ये कार्यध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. पक्षातील सर्व नियुक्त्या माझ्या सहीने झाली होती. संघटना निवडणूक न करता जयंत पाटील यांना तात्पुरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती करतो, आतापासून सर्व कामे ते पाहतील. जयंत पाटील यांना तसे सूचित करण्यात आले असल्याची माहिती, प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

संघटनेमधील बदल करण्याबाबत सगळे अधिकार सुनील तटकरे यांना राहतील.
कुठलीही निलंबनाची कारवाई एका व्यक्तीकडे नाही. विधानसभा अध्यक्षांकडे आहे.
अजित पवार यांना सगळ्या आमदारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केलं आहे.
तसेच अनिल पाटील (Anil Patil) यांना प्रतोद करण्यात आल्याची माहिती अध्यक्षांकडे दिली आहे, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra NCP Crisis | jayant patil was removed from the post of state president tatkare is
responsible declaration by ajit pawar and praful patel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा