भाजप सरकाच्या काळात जातीय तणाव वाढला : अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अहवाल सादर केला आहे. या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच हिंदु-मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातीमधील तणावाने घेतली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मागील पाच वर्षामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा सवर्ण-अनुसूचित जातीमधील तणावाने घेतल्याचे पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. हिंदू मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील आठ जिल्हे संवेदनशील म्हणून पोलिसांनी निवडले आहेत. तर सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेल्या 14 जिल्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सोलापूर, अहमदनगर, पालघर, ठाणे, पुणे, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदनशील आहेत. मात्र, मागील पाच वर्षामध्ये राज्यात तणावाची व्याप्ती वाढल्याचे समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि पुर्व विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात सवर्ण आणि अनुसूचित जातींमधील गेल्या पाच वर्षात तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

राज्यातील जातीय तणावाच्या घटना
2016 मध्ये अदखलपात्र घटना 5261, दखलपात्र घटना 2484
2017 मध्ये अदखलपात्र घटना 5755, दखलपात्र घटना 2407
2018 मध्ये अदखलपात्र घटना 6434, दखलपात्र घटना 2485
2019 (जुलै पर्यंत) अदखलपात्र घटना 3293, दखलपात्र घटना 1265

Visit – policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like