Maharashtra Police | पोलिस उपायुक्तांची तडकाफडकी बदली तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर (Agitation) मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातही मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. शनिवारी झोन दोनच्या पोलीस उपायुक्तांची (DCP Zone 2) उचलबांगडी केली होती. त्यानंतर आता गावदेवी पोलीस स्टेशनचे (Gaomdevi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे गोपीनाथ राजभर (Senior Police Inspector Rampiyare Gopinath Rajbhar) यांना थेट निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. सिल्व्हर ओक वर झालेल्या आंदोलनानंतर (Silver Oak Attack Case) साऊथ मुंबई कंट्रोल रुमला (South Mumbai Control Room) त्यांची बदली (Transfer) केली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra Police)

 

सिल्व्हर ओकवरील हल्ला प्रकरणात गृहमंत्र्यांकडे (Maharashtra Home Minister) सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Police)

 

पोलीस उपायुक्तांची बदली
झोन 2 चे पोलीस उपायुक्त योगेश कुमार (DCP Yogesh Kumar) यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली.

 

Web Title :- Maharashtra Police | sharad pawar house silver oak stir case gaomdevi police senior police inspector rajbhar suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा