Maharashtra Political Crisis | भाजप नेत्याचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, म्हणाले – ‘…ही पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा पाहात जा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) पहिले अधिवेशन (Monsoon Session) आहे. परंतु अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी विरोधकांनी सरकारवर जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामध्ये शिवसेना (Shivsena) देखील सामील झाली होती. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी यावेळी शिंदे-भाजप सरकारवर बोचरी टीका केली. याला भाजपने (BJP) प्रत्युत्तर (Maharashtra Political Crisis) दिले आहे.

 

विरोधकांनी आले रे आले 50 खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा (Maharashtra Political Crisis) विरोधकांनी दिल्या. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला. हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी यावर पलटवार करत खोचक टोला लगावला आहे.

 

आरशात स्वत:चा चेहरा पाहात जा

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
गद्दार, लोकशाहीचा खून… ही पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा ही पाहात जा आदित्य ठाकरे…,
असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला.

 

आदित्य ठाकरेंचे आव्हान

आम्ही 2019 मध्ये सत्तांतर करुन देशाला नवा पर्याय दाखवला. दुर्दैवाने आमच्यातील काही जण गद्दार निघाले ज्यांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.
ज्यांना मंत्रिपदावर संधी दिली त्यांचंही डिमोशन झालं आहे. आमच्याकडे असताना बरे होते.
आता पुन्हा आमचे दरवाजे खुले आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात असेल. परंतु सर्वांसाठी दरवाजे खुले आहे.
पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं,
अस आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied aaditya thackeray over criticism on eknath shinde and devendra fadnavis government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा