Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य, चंद्रकांत खैरेंवर गुन्हा दाखल होणार?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह (Shivsena Dhanushyaban Symbol) गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे गटांना शिवसेना नावाचा वापर करता येणार नाही. दोन्ही गटांना सोमवारी (दि.10) दुपारी एक पर्यंत त्यांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे दाखल (Maharashtra Political Crisis) करायचे आहेत. निवडणुक आयोगाच्या या कारवाईमुळे दोन्ही गटांना आता वेगवेगळ्या नाव आणि चिन्हासह निवडणूक लढवावी लागणार आहे.

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटांमध्ये (Shinde Group) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे खैरे यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल होण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) असते तर एकनाथ शिंदे यांना उलटं टांगलं असतं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते. (Maharashtra Political Crisis)

 

चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ (District President Rajendra Janjal) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच राजेंद्र जंजाळ यांनी खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे खैरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून तीन पक्ष चिन्हं ठरवण्यात आली आहेत.
यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्ह उद्धव ठाकरे गटाने ठरवली आहेत.
तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,
शिवसेना प्रबोधनकार ठाकरे अशी नावं देण्यात आली आहेत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

 

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | chandrakant khaire in trouble after controversial statement on cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा