Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच ! एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तीप्रदर्शन; खा. श्रीकांत शिंदे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसते. शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. यादरम्यान गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात (Thane) शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी ठाणेवाशियांना संबोधले. यावेळी ठाण्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले दिसले.

 

“अडीच वर्ष जी अनैसर्गिक आघाडी झाली. या आघाडीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे. असं का वाटलं ? कोणाचा तरी यामध्ये दोष असेल. कोणालातरी याचा त्रास होत असेल. एकट्या शिंदे यांना त्रास होत असेल किंवा पाच लोकांना होत असेल. मात्र 50 लोकांना त्रास कसा होऊ शकतो. याचा विचार झाला पाहिजे,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले, ”गेल्या अडीच वर्षांत या राज्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) आहे. लोकांना अपेक्षा होती, कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की, आमचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्या प्रमाणे आम्हालाही चांगले दिवस येतील.” असं ते म्हणाले. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, “संपूर्ण ठाणेकर आणि शिवसेना कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं,” श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
त्यावेळी ते म्हणाले, ”पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आम्हाला सर्व खासदारांना शिवसंपर्क अभियानासाठी पाठवलं.
या अभियानांतर्गत आपली सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, त्यांची काय परिस्थिती आहे.
हे जाणून घेण्यासाठी पाठवले. मी आधी परभणीला आणि नंतर साताऱ्याला गेलो.
तिकडे गेल्यानंतर परिस्थिती जी ऐकली, तिथले आमदार जे म्हणाले ते मी ऐकलं. मी सामान्य कार्यकर्ता नाही तर आमदारांचं रडगाणं सांगत आहे. काय म्हणाले आमदार, आम्हाला निधी मिळत नाही. आमच्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजन हे राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. आम्हाला जर निधी मिळाला, तर ते थांबवण्याचं काम राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकत नाही. जर आमची सत्ता असून आम्ही लोकांना न्याय देऊन शकत नाही तर काय फायदा अशा सत्तेचा.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | demonstration in support of eknath shinde in thane mp shrikant shinde also present maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा