Maharashtra Political Crisis | पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढवणार’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल  जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून कायम राहणार, ते राजीनामा (Resignation) देणार नाहीत, पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही आशावादी आहोत. आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल याची आम्हाला अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबलं पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणे योग्य नाही.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असं विरोधक म्हणत आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, हा मुर्खांचा बाजार आहे. एकनाथ शिंदे का राजीनामा देतील. काय चूक केली आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे असतानाच लढू असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल असे संकेत फडणवीस यांनी दिले का, अशी चर्चा सरु झाली आहे.

कोर्ट 16 आमदारांबाबत निर्णय देणार?

सुप्रीम कोर्ट 16 आमदारांबाबत स्वत: निर्णय देणार की हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker)
सुनावणीसाठी पाठवणार हे पहावं लागणार आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावरुन उचलबांगडी केली. परंतु, त्यानंतर शिंदे यांनी स्वत:ची नियुक्ती केली.
मात्र, ही नियुक्ती वैध आहे का? तसेच मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती वैध की
भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नियुक्ती वैध? यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे.

Web Title :-  Maharashtra Political Crisis | maharashtra political crisis dcm devendra fadnavis eknath shinde chief minister supreme court judgement maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना