Maharashtra Political Crisis | बंडखोर पुन्हा ’मातोश्री’च्या संपर्कात? दुसर्‍या पक्षात जाण्यावरून मतभेद कायम?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पक्षांतरविरोधी कायदा, उपसभापतींनी बजावलेली नोटीस, संतप्त झालेले शिवसैनिक आणि आता भाजपासोबत (BJP) जाण्यासाठी सुरू झालेली चर्चा, यामुळे एकनाथ शिंदे (Maharashtra Political Crisis | rebellion mlas are in contact with uddhav thackeray maharashtra politics maharashtra political crisisth Shinde) यांच्या बंडात सहभागी झालेल्या बंडखोर शिवसेना आमदारांमध्ये (Shivsena MLA) चलबिचल सुरू झाली आहे. शिंदे गटात यामुळे मतभेद झाल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाला ऑफर दिल्याचे समजते. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तसचे देशभरात राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

 

शिंदे गटाने सुरूवातीपासूनच आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्हाला कोणत्याही पक्षात जायचे नाही, फक्त हिंदुत्ववादी भाजपासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र आता भाजपासोबत जाण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे.

शिवाय, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पक्षांतरविरोधी कायद्यातील तरतुदीनंतर कोणत्याही गटाला वेगळे होण्याची परवानगी या कायद्यात नाही, असा मुद्दा समोर आल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. दुसर्‍या पक्षात विलिन होणे, असा एकच पर्याय शिंदे गटाकडे शिल्लक आहे, असे काही कायदेतज्ज्ञांनी सांगितले आहे.

 

दुसर्‍या पक्षात विलिन होणे शिवसेनेच्या अनेक बंडखोर आमदारांना परवडणारे नाही. पुढील निवडणूक यामुळे त्यांना जड जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मतभेद झाल्याचे वृत्त आहे. त्यातच भाजपाने शिंदे गटाला सत्ता स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री पद आणि इतर मंत्री पदांची ऑफर दिल्याने भाजपासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे या बंडखोर आमदारांना वाटत आहे.

 

उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या मागणीनंतर शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आहे. यामुळे सुद्धा बंडखोर आमदार धास्तावले आहेत.

बंडखोर आमदारांच्या पक्षप्रवेशावरून अद्याप वाद सुरू आहे.
भाजपा सरकार स्थापन करणार असेल तर बंडखोर आमदारांना पक्षप्रवेश अनिवार्य आहे.
त्यांना अपक्ष राहून सत्तेत सामील होण्यावर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे सध्या या आमदारांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

 

16 आमदार पुन्हा ’मातोश्री’च्या संपर्कात?

सत्तेसाठी दुसर्‍या पक्षात जाण्यावरून 20 ते 25 बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समजते.
त्यामुळे बंडखोर आमदार पुन्हा ’मातोश्री’च्या संपर्कात आले आहेत.
उद्धव ठाकरेंशी (CM Uddhav Thackeray) मध्यस्थी करण्याबाबत अनेक बंडखोरांचे सेनेच्या बड्या
नेत्यांना फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा 16 आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | rebellion mlas are in contact with uddhav thackeray maharashtra politics maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा