Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकार अल्पमतात; शिंदे गटाचे राज्यपालांना पत्र ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदार अधिकच आक्रमक होताना (Maharashtra Political Crisis) दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केला आहे. यावर सुनावणी सुरू आहे. अशातच दुसरीकडे शिंदे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मविआ सरकारला आणखी धक्का बसणार का ? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

शिंदे गटाच्या 38 शिवसेना आमदार आणि इतर 12 अपक्षांनी आघाडी सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्याचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे आता फक्त 115 आमदारांचं बहुमत शिल्लक आहे. तसेच, सरकार अल्पमतात आले आहे असे समजण्यास काही हरकत नाही असं याचिकेत म्हटलं आहे. याबाबतचं पत्र राज्यपालांना पाठवल्याचं सांगितलं जात आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पक्षाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे.
काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार नको अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर संकट उभं राहिले आहे. अशातच आता शिंदे गट राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolts maha vikas aghadi thackeray government in the minority letter to governor bhagat singh koshyari of shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा