Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुनावणी लांबणीवर; सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

नवी दिल्ली : Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि चिन्हं (Shiv Sena Party Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. यावर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. मात्र, कोणताही निर्णय आज झाला नाही. पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी घेऊ, असे सरन्यायाधीशांनी म्हटले. तत्पूर्वी झालेल्या सुनावणी, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्यांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे देखील ओढले. (Maharashtra Political Crisis)

आज ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud), न्यायाधीश जे. बी. पारदीवाला (Judge J. B. Pardiwala) आणि न्यायाधीश मनोज मिश्रा (Judge Manoj Mishra) यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) म्हणाले, शिवसेना चिन्हाचे प्रकरण तुम्हाला ऐकावे लागेल. कृपया तारीख निश्चित करावी. त्यावर, तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.

दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना म्हटले, ठराविक वेळेत घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले होते. पण, ११ मेनंतर काहीही झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही. (Maharashtra Political Crisis)

Advt.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला उत्तरदायी आहेत.
तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावे लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या.
दोन आठवड्यात काय कारवाई केली, ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची सनातन धर्मावर बोलणाऱ्यांवर जहरी टीका; म्हणाले – ‘यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही…’ (व्हिडिओ)