Maharashtra Political News | पक्षाचे अध्यक्ष पुण्यात अन् आमदारांची बैठक मुंबईत, राष्ट्रवादीच्या गोटात चाललयं तरी काय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच अजित पवार यांनी पुण्यातील दौरा अचानक (Maharashtra Political News) रद्द केला. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी अजित पवारांबाबत सूचक विधान केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदारांची (NCP MLA) मुंबईत जमवाजमव सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार मुंबईला निघाले आहेत. पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाला आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या गैरहजेरीत मुंबईत आमदारांची बैठक कशी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) हे मुंबईत बैठकीसाठी जात आहेत. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पहा असं सांगितल आहे. त्यामुळे आमदार (Maharashtra Political News) कोणत्या गोड बातमीची प्रतिक्षा करत आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अण्णा बनसोडे आपल्या काही कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

बावनकुळेंचं सूचक विधान

देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत आहे. कालपर्यंत कोणत्या विचारधारेत होता, माहिती नाही.
पण, आमच्या पक्षात आल्यावर विचारधारेच्या आधारावरच काम करावं लागतं.
पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करावा लागतो.
त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असला, तर आमचा विरोध नाही.
बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला
आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title :- Maharashtra Political News | a meeting of ncp mlas was called in mumbai sharad pawar will not attend the meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल