Maharashtra Political News | मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली, अजित पवार म्हणाले – ‘मी वेगवेगळ्या…’

खाते वाटपाची संभाव्य यादी सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा पेच अखेर मिटला आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ खातेवाटप जाहिर (Cabinet Portfolio Allocation) केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे ओएसडी खातेवाटपाची यादी घेऊन राजभवनावर पोहचले आहेत. आता या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे खाते वाटपाच्या यादीवर सही करतील. (Maharashtra Political News) राज्यपालांच्या सहीनंतर खातेवाटप जाहिर केले जाईल. खाते वाटपाची यादी राजभवनावर (Raj Bhavan) गेल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुजोरा दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

अजित पवार म्हणाले, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाची यादी जाहीर होईल. खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे. राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याबाबत आदेश निघेल आणि कोणाला कोणती खाती मिळाली हे समजेल. मात्र कोणला कोणते खाते मिळाले, याबाबत बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रीमंडळात काम केले आहे. त्या-त्यावेळी कोणाला कोणतं खातं द्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आहोत, ते देईल ते खाते आम्ही घेतो. आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची आमची मानसिकता आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. (Maharashtra Political News)

 

अजित पवार गटाच्या वाट्याला कोणती खाती?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
त्यामुळे या सगळ्यांना कोणती खाती मिळणार,
याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आज संध्याकाळपर्य़ंत खाते वाटप जाहिर होईल असे सांगण्यात येत आहे.
मात्र, सोशल मीडियावर खाते वाटपाची यादी व्हायरल होत आहे. यामध्ये अजित पवार यांना अर्थखाते (Finance Minister) देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषी खातं (Agriculture) दिले आहे. दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांना सहकार, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना वैद्यकीय शिक्षण, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अन्न आणि नागरी पुरवठा, धर्मराव अत्राम (Dharmarao Atram) यांना अन्न आणि औषध प्रशासन, अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांना क्रीडा तर अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यावर महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

Web Title : Maharashtra Political News | ajit-pawar-comment-on-portfolio-distribution-of-state-government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा