Maharashtra NCP Crisis | ‘शरद पवार नमस्कार करत फिरले, तरी…’, काँग्रेस नेत्याचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी (NCP Rebellion) करत सत्ताधारी पक्षात सामील झाले. राष्ट्रवादीमध्ये अचानक झालेल्या बंडखोरीमुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा नेमका आकडा (Maharashtra NCP Crisis) अद्याप समोर आला नाही. मात्र, या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पुन्हा पक्ष उभारणी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Senior Congress Leader Balasaheb Thorat) यांनी भाष्य केलं आहे. ते एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Maharashtra NCP Crisis) पुर्नबांधणी करु शकतील का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला. यावर थोरात म्हणाले, शरद पवार राज्यात फिरून लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेला (Vidhan Sabha) चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा राहिल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील.

 

शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये येऊन राजकारण करावे, असं वाटतं का? यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वतंत्रपणे राजकारण केलं आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा विचार वेगळा नाही. फक्त दोन पक्ष आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, त्यातूनच यश मिळेल.

 

काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले.
काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण,
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्ही खूप चांगले होते.
वज्रमूठ सभेमुळे ((MVA Vajramuth Sabha)) लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती.
त्यावेळच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेच्या 38 आणि विधानसभेच्या 180 जागा मिळतील असे सांगितले जात होते. यामुळे वाटायचं की भाजपला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

 

Web Title : Maharashtra NCP Crisis | balasaheb thorat on sharad pawar ajit pawar and ncp split

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा