कोल्हापूर : Maharashtra Political News | आगामी निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या हालचाली आतापासून वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील नेते सुद्धा कामाला इलेक्शन मोडवर गेले आहेत. कोल्हापुरात नेहमीच चर्चेत असलेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Kolhapur South Assembly Constituency) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे आमदार ऋतुराज पाटील (MLA Rituraj Patil) विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक (Former MLA Amal Mahadik) यांच्यात सामना रंगणार आहे. परंतु याच मतदार संघात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे देखील इच्छूक असल्याने पुन्हा एकदा हा मतदार संघ चर्चेत आला आहे. (Maharashtra Political News)
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदार संघ भाजपाकडे (BJP) जाणार की शिंदे गटाकडे (Shinde Group) हे अद्याप स्पष्ट नसल्याने अमल महाडिक की राजेश क्षीरसागर हे नंतरच ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत महाडिक आणि पाटील आपले सर्वस्व पणाला लावतात. विधानसभा निवडणुकी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात या दोघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांचा गट आणि महाडिक हे पारंपारिक आहेत. आता या दोघांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेत येत असलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील तयारीला लागले आहेत.
दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राजेश क्षीरसागर अंदाज घेण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा हा त्यांचा मतदार संघ आहे. त्या ठिकाणी दोनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. पण २०१९ ला दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर शिवसेनेचा (Shivsena) हा त्यांचा बालेकिल्ला काँग्रेसकडे (Congress) गेला. (Maharashtra Political News)
चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) धर्म म्हणून राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा द्यावा लागला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून फूट पाडल्यानंतर राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात गेले. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर भाजप दावा सांगत असल्याने महायुतीमधील क्षीरसागर यांची गोची झाली आहे. म्हणून ते कोल्हापूर दक्षिणकडे चाचपणी करू लागले आहेत.
यामुळे क्षीरसागर यांनी, दक्षिण ना उत्तर विकासाचं पर्व हे दक्षिणोत्तर या टॅगलाइनखाली दोन्ही मतदारसंघात
कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिणेतून मी सज्ज असल्याचे ते दाखवून देत आहेत.
अमल महाडिक यांनी २०१४ साली सतेज पाटील यांचा पराभव करत दक्षिण विधानसभा ताब्यात घेतला.
मात्र सतेज पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटीलला उमेदवारी देऊन मतदारसंघ पुन्हा मिळवला.
आता पुन्हा या मतदारसंघासाठी दोघांत रस्सीखेच सुरू असताना अमल महाडिक यांच्या विजयासाठी राज्यसभेचे
खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या आधीच रणशिंग फुंकले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी अमल महाडिक यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे की,
भाजपच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात विकास कामे केली आहेत.
त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिकच निवडणूक लढवतील आणि ते निवडून सुद्धा येतील.
मात्र, या राजकीय हालचाली वेग धरत असताना विद्यमान आमदार ऋतुराज पाटील अद्यापही शांत असले तरी
कोल्हापूर दक्षिण निवडणूक महाडिक विरुद्ध पाटील अशी होणार असल्याचे दिसत आहे.
महायुतीमुळे दक्षिण मतदार संघ भाजपाकडे जातो की, शिंदे गटाकडे हे स्पष्ट नाही.
मात्र हे सत्य आहे की, कोणाचा तरी एकाचा पत्ता कट होणार.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा