Maharashtra Political News | निलेश राणेंच्या नाराजीचं खरं कारण आलं समोर, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत तोडगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहिर केल्यानंतर कोकणातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं. निलेश राणेंच्या या भूमिकेनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि राणे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. परंतु, निलेश राणेंची मनधरणी करण्यात भाजपला (BJP) यश आले आहे. (Maharashtra Political News)

आज (बुधवारी) सकाळी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. जवळपास दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे हे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले. त्याठीकाणी झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या नाराजीचं कारण समोर आलं. यावर बैठकीत तोडगा कढून पुढील काळात कोकणात निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा झंझावात सुरु राहील असे रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर निलेश राणेंनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, खरेतर निलेश राणेंनी ट्विट केल्यानंतर आमच्यासारख्या प्रत्येकाला नक्की काय झालं हे समजत नव्हेत. मात्र, त्यानंतर आम्ही नारायण राणेंशी चर्चा केली. नारायण राणे यांनी देखील निलेश राणे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी मी स्वत: निलेश राणे यांच्या घरी जाऊन चर्चा केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर निलेश राणेंसोबत चर्चा केली.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात आली काहीतरी घडलं होतं त्यामुळे हे झालं. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी निलेश राणेंनी ही भूमिका घेतली होती. ज्यावेळी लहान कार्यकर्ता काम करत असतो, त्यावेळी त्याला येणाऱ्या अडचणी नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी निलेश राणेंची होती, असं चव्हाण यांनी सांगितलं. (Maharashtra Political News)

तसेच निलेश राणे यांचे हे म्हणणे योग्य होते. या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गांभीर्य़ाने विचार करु. कोणत्याही निवडणुकीत नेतेमंडळी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करतो. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कार्य़कर्त्यांच्या भावना असतात त्यादेखील नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. या भावना जाणून न घेतल्याने निलेश राणे नराज होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता आहे. त्यामुळे कार्य़कर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहचवत नाहीत यादृष्टीने त्यांनी रागातून का होईना हा निर्णय घेतला. परंतु मी, नारायण राणे, नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वजण लक्ष घालू असं आश्वसित केले असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणे हे पक्ष संघटनेला परवडणारं नाही. त्यामुळे मी स्वत: फार आग्रह केला
की असं करु नका. यानंतरच्या काळात असं काही होणार नाही. तुम्ही आम्ही छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी
समजून घेऊ आणि या दिशेने वाटचाल करु. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

निलेश राणेंच्या नेतृत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच कोकणातील इतर भागात त्यांचा झंझावात येत्या काळात सुरु राहील.
आम्ही भाजपचे कार्य़कर्ते पक्ष संघटनेसाठी अतिशय जोमाने काम करतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर सगळी मदार असते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची तयारी सुरु आहे. मात्र, ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांच्याही अडचणी
समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. प्रमुख नेत्यांनी या अडचणी समजू घ्याव्यात अशी मागणी नितेश राणे यांची होती
आणि ती मागणी रास्त होती. त्यांची नाराजी स्वाभाविक होती. यानंतरच्या काळात असं काही घडणार नाही अशी
खात्री आम्ही दिली आहे, असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रिकाम्या टाकीत गॅस भरताना स्फोट, एकजण जखमी; कोथरुडमधील घटना, दोघांवर FIR

Pune Crime News | घरमालकाला गुंगीचे औषध देऊन नोकरांचा पैशावर डल्ला, औंध परिसरातील घटना

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू, म्हणाले – ‘सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय’