Maharashtra Political News | राष्ट्रवादीचा दुसरा गटही महायुतीत येईल? शिंदे गटाचे आमदार म्हणाले – ‘राजकारणात काहीही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी (NCP Rebel MLA) केल्याने पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. (Maharashtra Political News) अजित पवार गटातील आमदारांची संख्या ही 30 पेक्षा अधिक आहे. तर उर्वरित 15 ते 20 आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आहेत. अशातच राष्ट्रवादीचा दुसरा गटही महायुतीत जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीदेखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं.

राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) सुरु असलेल्या चर्चांवर शिवसेना Shivsena (शिंदे गट-Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी माध्यमांशी बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं, असं विधान केलं आहे. ते विधिमंडळ बाहेर वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत सहभागी होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, राजकारणात (Maharashtra Political News) भविष्यवाणी करणं योग्य नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं, हे देखील तितकच खरं आहे, याला इतिहास साक्षी आहे.

संजय गायकवाड पुढे म्हणाले, राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत.
जे विचार कधी एकत्र येऊ शकत नव्हते असे पक्ष अलिकडच्या काळात एकत्र आल्याचे आपण बघितले आहे.
शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आल्याचे आपण पाहिलं आहे.
त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकत्र आले तर नवल वाटणार नाही, असे गायकवाड म्हणाले.

यावेळी गायकवाड यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले, अद्यापपर्यंत विरोधी पक्ष त्यांचा नेता
(Opposition Leader) निवडू शकले नाहीत, हे विरोधी प्रक्षाचं प्रचंड मोठं अपयश आहे.
आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे.
मात्र, अद्याप विरोधकांना त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही. कारण त्यांच्यात संपर्क नाही.
त्यांच्या कितीही बैठका होत असल्या तरी विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचे अद्याप एकमत झालेलं नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण