Maharashtra Political News | अखेर ठरलं! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) अखेर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या (Congress) हायकमांडकडे सोपवण्यात आला होता. (Maharashtra Political News) अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडेच असणार आहे.

अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. विधानसभेत (Legislative Assembly) ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे. (Maharashtra Political News)

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झालं होतं. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), सुनील केदार (Sunil Kedar) आणि संग्राम थोपटे (Sangram Thopet) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी तीस आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीला पाठवलं होतं. मात्र अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) या आठवड्यात संपणार आहे.
आधीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडले.
त्यामुळे अखेरच्या तीन दिवसांत विरोधी पक्षनेते किती आक्रमक होतात हे पाहावं लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

PM Modi’s Pune Visit: Metro Rail Inauguration, Waste-to-Energy Plant, and PMAY Houses – Live Updates