Maharashtra Politics | बुलढाण्यातील मोताळा नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाला मोठे यश; काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले १२ पैकी ८ नगरसेवक शिंदे गटात

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यात पदवीधर निवडणुकीची (Graduate Constituency Election) धामधूम सुरू असतानाच बुलढाणा येथे शिवसेनेच्या शिंदे गटासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील मोताळा नगरपंचायतीमध्ये (Motala Nagar Panchayat) काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर निवडून आलेल्या १२ पैकी ८ नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)
मोताळा नगरपंचायतीची निवडणुक होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आहे. निधी मिळत नसल्यामुळे विविध विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे मोताळा नगरपंचायतीमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या १२ पैकी ८ नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यात मोताळा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा शेहनाजबी शेख सलीम, गट नेत्या पुष्पा चंपालाल जैन, शेख तस्लिम शेख सलीम बाबा, खातूनबी शेख रशीद, शीला कैलास खर्चे, सरिता विजय सुरडकर, परवीनबी शेख आसिफ यांचा समावेश आहे. यावेळी शेख सलीम चुनवाले, जलील खाँसाहब, शेख आसिफ, विजय सुरडकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
एक वर्षापूर्वी मोताळा नगपंचायतीची निवडणुक झाली होती.
या निवडणुकीत एकुण १८ जागांपैकी १२ जागांवर विजय संपादित करत स्पष्ट बहुमत मिळवले होते.
काँग्रेसचे दिवंगत नेते नाना देशमुख (Nana Deshmukh) यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष माधुरी देशमुख (Madhuri Deshmukh) या पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
या घाऊक पक्षांतराची बीजे तेव्हाच रोवली गेल्याचे बोलले जाते. हा प्रवेशसोहळा झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ.
असा शब्द शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना दिला.
Web Title :- Maharashtra Politics | 8 congress corporators in motala nagar panchayat in shinde group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर