Maharashtra Politics | राहुल शेवाळे यांची नियुक्ती 18 जुलै रोजीच, लोकसभा सचिवालयाचा निर्णय संशयास्पद, सुप्रीम कोर्टात दाद मागणार- विनायक राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shivsena) सुरु असलेल्या संघर्ष दिवसेंदिवस आणखीनच टोकदार होत चालले आहे. आमदारांनी बंड (Maharashtra Politics) केल्यानंतर लोकसभेतील शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनीही (MP) वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी या गटाला आणि शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे (Group Leader Rahul Shewale) यांच्या निवडीला मान्यता दिली. या मुद्यावरुन आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाद मागणार असल्याचे जाहिर केलं आहे.

 

लोकसभेत शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदास राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आधीच ठरवण्यात आला होता. शिंदे गटाच्या खासदारांनी 19 जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. मात्र, लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) त्याआधीच जाहीर केलेल्या गटनेत्यांच्या यादीत राहुल शेवाळे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी नियुक्त केलेला गटनेता मीच असून आम्ही आता कायदेशीर लढाई (Maharashtra Politics) लढणार असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटलं.

 

राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकत्र येऊन दिले.
त्यानंतर राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. आता, या नियुक्तीवरच शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेना लोकसभा गटनेतेपदी नियुक्ती करण्यासाठी कोणी दावा केला तर आमचं म्हणणे मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करणारे पत्र आम्ही लोकसभा अध्यक्षांना 18 जुलै रोजी दिले होते.
तर 19 जुलै रोजी आम्ही प्रत्यक्ष त्यांची भेटही घेतली होती.
त्यानंतर 19 जुलै रोजी राहुल शेवाळे यांची लोकसभा गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.
आमचं म्हणणं मांडण्याचा नैसर्गिक न्याय नाकारण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
लोकसभा सचिवालयाची भूमिका संशयास्पद असल्याचे राऊत यांनी म्हटले.

लोकसभा सचिवालयाने 19 जुलै रोजीच्या तारखेचे एक परिपत्रक (Circular) काढले.
या परिपत्रकात गटनेतेपदाच्या यादीत राहुल शेवाळे यांच्या नावाचा समावेश होता.
त्यामुळे शेवाळे यांची नेमणूक आधीच ठरवण्यात आली होती, असा आरोप राऊत यांनी केला.
लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. पक्षाचे प्रमुख गटनेतेपदाची निवड करतात.
त्यासाठीचे पत्रही दिले जाते. माझ्या निवडीचेही पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते.
लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics | appoint to mp rahul shewale on shivsena loksabha group leader was preplan say shivsena mp and leader vinay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’

 

Sangli Crime | सांगलीचा ‘पुष्पा’; चक्क पोलिस मुख्यालयातून चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक

 

Chandrakant Patil | शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे पुणे महापालिका आयुक्तांना पत्र