Maharashtra Politics | कोणच्या गाडीत बसावे? यावरून मुख्यमंत्र्यांपुढे पेच; अखेर दिली यांच्या गाडीत बसण्यास पसंती

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | अनेकदा, साहेब माझ्या गाडीत बसा. असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत असते. आपल्या लाडक्या नेत्याने आपल्या गाडीतून प्रवास करावा अशी देखील काहींची इच्छा असते. तसाच काहीसा पेचप्रसंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यापुढे उभा राहिला यावर त्यांनी संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या गाडीतून प्रवास करण्यास पसंती दर्शविली. (Maharashtra Politics)

 

झालं असं की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी औरंगाबाद विमानतळावर पोहचले. यावेळी त्यांच्या पुढील प्रवासासाठी दोन अलिशान गाड्या औरंगाबाद विमानतळाबाहेर लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक गाडी होती राज्याचे रोहयो मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या संदिपान भुमरे यांची. तर दुसरी गाडी होती ती म्हणजे ज्यांना मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत त्यांची. ते म्हणजे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची. (Maharashtra Politics)

या दोनही गाड्या सेम होत्या फक्त नंबर आणि कलरमध्ये फरक होता. या दोनही गाड्या लँड रोव्हर कंपनीच्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच गाडीमध्ये बसावे अशी दोन्ही नेत्यांची इच्छा होती. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री संदिपान भुमरे यांच्या गाडीत बसले. त्यामुळे संजय शिरसाट यांची गाडी माघारी परतली.

 

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले होते. त्यावेळी मराठवाड्यातील हे दोन्ही नेते त्या बंडाचे शिलेदार होते.
आणि नेटाने या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यावेळी साथ दिली.
मात्र, मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान संदिपान भुमरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले.
संजय शिरसाट यांना वेटिंगवर ठेवण्यात आले.
त्यामुळे आता दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना स्थान मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

Web Title :- Maharashtra Politics | cm eknath shinde finally sat in sandipan bhumre car sanjay shirsat car returned at aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण