Maharashtra Politics |राज्यात राजकीय हालचालींना वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजपाचा प्लॅन बी तयार?, बावनकुळे म्हणाले…

मुंबई : Maharashtra Politics | आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी विलंब करत असल्याने नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी घ्या, असे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष दिल्लीला रवाना झाले आहेत. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात मोठी राजकीय उलथा-पालथ होणार आहे. पुढील मुख्यमंत्री कोण? असाही प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, भाजपाने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला असल्याचीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील आणि नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. (Maharashtra Politics)

भाजपाच्या ‘प्लॅन बी’बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, याबद्दल मला कुठलीही माहिती नाही. याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. राज्यात पुन्हा एकदा चर्चा घडवून आणण्यासाठी कुणीतरी हा फुसका बॉम्ब सोडला आहे.

राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला गेले आहेत, याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या असतील, काही टिप्पणी केली असेल किंवा नार्वेकरांनी काय पुढाकार घ्यावा, यासाठी कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. कायद्याची बाजू तपासून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत.

बावनकुळे पुढे म्हणाले, मला विश्वास आहे की, राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
ते कायदेपंडित आणि कायदेतज्ज्ञ आहेत. ते जो काही निकाल देतील, तो निकाल कायद्याच्या चौकटीत देतील.
ते एककल्ली निर्णय घेणार नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद