Maharashtra Politics News | ‘…तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल’, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाकरे गटाची (Thackeray Group) दादर येथे पदधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची शनिवारी (दि.24) बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकार (Modi Government), भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लबोल केला. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे, असा इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भाजप (Maharashtra BJP) आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्यावर आज केलेली वैयक्तिक आणि घाणेरडी टीका ठाकरे यांचे मानसिक संतुलन आता पूर्णतः ढळले असल्याचे द्योतक आहे, असं ट्विट भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे म्हटले आहे. काही दिवसांपासून ठाकरे यांच्या या वायफळ बडबडीमुळे त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकांच्या मनात असंख्य शंका होत्या. पण ते आता मानसिकदृष्टया रुग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्रातील जनतेला मिळाला आहे, असंही भाजपने म्हटलं आहे.

ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर देवेंद्र फडणवीस यांनी कधीही अशी टीका केली नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांनी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काय काय केले. या गोष्टी सांगितल्या तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल, असा इशारा भाजपने दिला आहे. उद्धव ठाकरे हे हवापालट करण्यासाठी मध्यंतरी परदेशात जाऊन आले. ते नेमके फिरायला गेले होते की मानसिक उपचारासाठी गेले होते? हा एक संशोधनाचा विषय आहे, असंही भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

Web Title : Maharashtra Politics News | after uddhav thackerays criticism of devendra fadnavis bjp has also become aggressive

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा