Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवा भूकंप ! संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?, भाजप आमदाराचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेनेतील बंडापासून (Rebellion in Shiv Sena) महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकारणात आजपर्यंत अनेक भूकंप झाले. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजकारणात (Maharashtra Politics News) आणखी एक भूकंप होणार आहे. येत्या आठवड्यात हा भूकंप होऊ शकतो, असा दावा राणे यांनी केला आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्यावर आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पवारांसोबत (Maharashtra Politics News) अनेक बैठका झाल्याचा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. तसेच राऊत हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होऊ देत नाही. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

 

ज्या दिवशी अजित पवार…
नितेश राणे पुढे म्हणाले, संजय राऊत यांची भूमिका पहा ते कायम अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करत आले आहेत. संजय राऊत यांची अशी अट आहे की, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं राणे यांनी म्हटलं आहे.

 

10 जून किंवा त्यापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार
मुंबईच्या वज्रमूठ सभेआधी (Vajramooth Sabha) मी सांगितलं होतं की, बिकेसीमध्ये होणारी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) शेवटची सभा आहे. मात्र, लोकांनी मला हलक्यात घेतलं. परंतु, काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आले. आता ते भाकीत जसं खरं ठरलं तसचं आता संजय राऊत हे 10 जून किंवा त्यापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

 

स्वत:च्या ताकदीवर मुंबई बंद करुन दाखवा
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बारसू बळजबरीनं (Barsu Refinery Project)
लादल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
उद्धव ठाकरेंच्या विधानाचा राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.
त्यांनी महाविकास आघाडीची मदत न घेता स्वत:च्या ताकदीवर आधी मुंबई बंद करुन
दाखवावी असं खुलं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे.

 

Advt.

Web Title :- Maharashtra Politics News | BJP MLA nitesh ranes big secret explosion about Shivsena UBT MP sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या