Maharashtra Politics News | मोर्चापूर्वीच भाजपने ठाकरे गटाला घेरलं; ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा

ठाकरे गटाने मोर्चाचा मार्ग बदलला, पण पोलिसांच्या परवानगीची प्रतिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) विराट मोर्चा काढणार आहे. पण या मोर्चाला पोलिसांनी (Mumbai Police) परवानगी नाकारली. आता ठाकरे गटाकडून मोर्चाच्या मार्गात बदल केला जाणार आहे. ठाकरे गटाने पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर मार्ग बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या विराट मोर्चावरुन भाजपने (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर (Babulnath Temple) आणि मलबार हिल (Malabar Hill) परिसरात बॅनर झळकले असून या माध्यमातून ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. यावर मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांचे नाव आहे.

ठाकरे गटाने मोर्चाचा मार्ग बदलला

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैच्या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलेलं आहे. यावर उद्यापर्यंत मुंबई पोलीस निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी मेट्रो सिनेमा (Metro Cinema) ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत (Times of India Building) या मार्गावरून मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्नावरुन या मार्गावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर ठाकरे गटाने मेट्रो सिनेमा ते थेट महानगरपालिका इमारत (BMC) या मार्गावरून मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या बॅनरची चर्चा

‘ओळखा पाहून कोण?’ मुंबईची करुन लुटमार कोणीतरी एक झालंय मालदार, मांडलाय मुंबईचा बाजार सत्तेबाहेर गेल्यामुळे झालाय आता बेजार! असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरवर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांचे नाव आहे. या बॅनरमध्ये कोणाचेही नाव घेण्यात आले नाही. परंतु या बॅनरचा रोख हा ठाकरे गटाकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Web Title :  Maharashtra Politics News | bjp strongly criticized the thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा