Maharashtra Politics News | ‘भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु, भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह’- नाना पटोले (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | केंद्रातील नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे (BJP Government) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. नऊ वर्षापासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस (Congress) हाच पर्याय जनतेला दिसत आहे. (Maharashtra Politics News ) काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकीत या जनभावनेचे चित्र दिसले. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून कधीही निवडणुका घेतल्या तरी काँग्रेस तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Pradesh Congress) आयोजित केलेल्या दोन दिवसीय बैठकीची आज सांगता झाली.
या दोन दिवसांमध्ये 41 मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. (Maharashtra Politics News) मुंबईतील 6 व चंद्रपूर मतदारसंघाचा आढावा लवकरच स्वतंत्रपणे घेतला जाईल.
जास्तीत जास्त मतदार संघातून काँग्रेसने लढावे असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
पटोले पुढे म्हणाले, काँग्रेसी संघटनात्मक ताकद सर्व मतदारसंघात आहे.
काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा असून जनतेचा काँग्रेसवर विश्वास आणखी दृढ झाला आहे.
आजच्या आढावा बैठकीनंतर लवकरच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक होणार आहे.
या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. आघाडीत सर्व पक्ष चर्चा करुन जागावाटपावर निर्णय घेतील.
भाजपचा पराभव करणे हाच आमचा निर्धार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
Web Title : Maharashtra Politics News | congress is ready for lok sabha elections enthusiasm among workers to defeat bjp nana patole
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले