Maharashtra Politics News | 16 आमदार अपात्र झाले तर सरकार पडणार? राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितलं गणित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल नेमका लागणार कधी, गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठानं आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत निकाल लागण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय (Maharashtra Politics News) हालचालींना वेग आला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची (NCP) भूमिका आणि अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच 16 आमदार अपात्र (MLA Disqualified) झाले तर सरकार (Government of Maharashtra) पडणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.

 

काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले, आज सत्ताधाऱ्यांसोबत 165-170 आमदार आहेत. यापैकी 16 आमदार अपात्र झाले तरी ते सरकार (Maharashtra Politics News) बहुमतात राहते. यात राष्ट्रवादीचा काहीच संबंध येत नाही. जर सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आणि त्यातून निर्माण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आमदार अपात्र झाले तर केंद्र सरकारला (Central Government) इथं राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, असं मी वारंवार सांगत आहे असंही पाटील म्हणाले.

 

विचारधारा एक होऊ शकत नाही-बावनकुळे
जीवनात जर-तरला काहीच अर्थ नसतो आणि कुणीही घेऊ नये. सुप्रीम कोर्टाचा निकालावर आतापासून प्रश्नचिन्ह उभे करणे योग्य नाही. आम्ही नेहमीच राष्ट्रवादीचे विरोधक आहोत. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा एक होऊ शकत नाही. आम्ही वैचारिक विरोधक आहोत असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येण्यावर भाष्य केले आहे.

कधी लागू शकतो निकाल?
– ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.

– न्यायमूर्ती एम.आर. शाह (Justice M.R. Shah) हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत.
त्यामुळे 14 मे च्या आधी कधीही हा निकाल येणार हे निश्चित मानलं जात आहे.

– 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहे. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे.

– एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकाल लागू शकतो, असं कायदे तज्ज्ञ सांगतात.

 

Web Title :- Maharashtra Politics News | even if 16 mlas are disqualified the government in the state will not collapse ncp jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल

Dr. Baba Adhav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची (UBT) मागणी

Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी व तिच्या 2 लहान मुलांचा खून करणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक