Maharashtra Politics News | शिंदे सरकार जाणार नाही, अजित पवारांना विश्वास, तर जयंत पाटील म्हणतात ‘सरकार जाणार कारण मुख्यमंत्री…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकाल जाहीर केला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी शिंदे सरकार कायम आहे. मात्र, राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आमदारांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics News) निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena Thackeray Group) मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील दोन वरिष्ठ नेत्यांनी विसंगत मतं व्यक्त केली आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वत:चं स्पष्ट मत आहे, 288 पैकी यदाकदाचित 16 आमदारांचा निकाल काही वेगळा लागला. वेगळा निकाल लागणार नाही म्हणा. पण समजा लागला तरी त्या निकालाचा राज्य सरकारच्या (State Government) बहुमतावर परिणाम होणार नाही. 288 पैकी 16 गेले तरी 272 राहत आहेत. 272 मध्ये त्यांना स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदारांच्या निलंबनाचा सरकारवर (Shinde-Fadnavis Government) काही परिणाम होईल असं आतातरी दिसत असल्याचे अजित पवार म्हणाले.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, या 16 आमदारांमध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आहेत.
मुख्यमंत्रीच जर अपात्र ठरले तर हे सरकार जाणार. कारण जेव्हा मुख्यमंत्री जातो तेव्हा सरकारही जातं.
(Maharashtra Politics News) राहिला प्रश्न बहुमताचा, तर 288 पैकी 16 आमदार गेले तर बाकी शिवसेना सदस्य
जे शिंदे गटात आहेत त्यांचा विचार बदलू शकतो. ते कदाचित पुन्हा ठाकरे गटाकडे जातील. मग सरकार बदलणार.

 

मुख्यमंत्री अपात्र ठरले आणि त्यांचा राजीनामा आला तर नव्या सरकारच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होते.
विधानसभेत ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य आहेत त्यांना राज्यपाल सत्तास्थापनेचं आमंत्रण देऊ शकतात.
त्यांनी बहुमत सिद्ध केलं तर त्यांचं सरकार बनेल. पण बहुमत सिद्ध करु शकले नाही तर सत्ताबदल होऊ शकतो,
असंही जयंत पाटील म्हणाले.

 

Web Title : Maharashtra Politics News jayant patil shinde fadnavis govt will collapse if 16 mla disqualified

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा