Maharashtra Politics News | खा. श्रीकांत शिंदेंच्या राजीनामा देण्याच्या इशाऱ्यावर मंत्री रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘भाजप कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर…’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेना Shiv Sena (शिंदे गट-Shinde Group) खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण (Maharashtra Minister Ravindra Chavan) यांच्यात वाद सुरुच असून श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याच्या वक्तव्यावरुन रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे प्रकरण फार छोटं आहे, जास्त ताणण्याची गरज नाही, भाजप (BJP) कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या मागे राहणं हे आमचं कर्तव्य असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. (Maharashtra Politics News)

 

डोंबिवलीमधील भाजपचे (Dombivli BJP) पदाधिकारी नंदू जोशी (Nandu Joshi BJP) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदरकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. यावर आता सार्वजनिक बांधकाम (Maharashtra Public Works Department (PWD) Minister Ravindra Chavan) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार शिंदेंच्या राजीनामा देण्याच्या गोष्टीची एक प्रकारे हवा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) रंगली आहे.

 

रविंद्र चव्हाण म्हणाले, भाजपच्या एखाद्या कर्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. तेच मी करतोय. या प्रकरणाला एवढं ताणायची गरज नाही. हे फार छोटं प्रकरण आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या काही कर्यकर्त्यांवर सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर कार्यकर्त्यांचं मत मी वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचं काम करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

 

शिंदेंच्या विजयात भाजपची मेहनत

रवींद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांना भाजपमुळे निवडून आल्याची आठवण करुन देत आपल्या विरोधात
व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल करणाऱ्यांचा समाचार घेतला. 2014 आणि 2019 साली श्रीकांत शिंदे यांच्या विजयामध्ये
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता खासदारापर्यंत असलेले कार्यकर्ते हे नवीन आहेत, ते त्यावेळी कुठे होते?
आता ते आपल्या विरोधात व्हॉट्सअॅपवर मेसेज पसरवत आहेत. कल्याण लोकसभेचा उमेदवार हा एनडीएचा (NDA)
उमेदवार असेल आणि त्याला मोठ्या मतांनी आम्ही विजयी करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

 

Web Title :  Maharashtra Politics News | kalyan dombivli bjp ravindra chavan on shivsena shrikant shinde shiv sena vs bjp in kalyan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा