Maharashtra Politics News | ‘… तर मी विरोध करणारच’, बाजार समित्यांच्या मुद्यावरुन अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये खडाजंगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | बाजार समित्यांच्या मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. नाना पटोले यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत पटोलेंना (Maharashtra Politics News) सुनावलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर बाजार समिती निवडणुकीत (Market Committee Election) भाजपसोबत (BJP) एकत्र आली तर ते चुकीचे आहे, आपण विरोध करणारच असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी अशाप्रकारची वक्तव्य करतात. अनेकदा आम्हालाही काही माहिती मिळते. अशी वक्तव्ये केल्याने कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अंतर पडू शकतं. पटोले यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी जयंत पाटलांशी (Jayant Patal) बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलावं. त्यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. मविआची सभा (Maharashtra Politics News) होईल तेव्हा मी जरुर या गोष्टी तिथं मांडेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कुठलीही आघाडी झालेली नाही

गोंदियात राष्ट्रवादी-भाजप युतीवर (NCP-BJP Alliance) बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारची कुठलीही आघाडी झालेली नाही. फक्त सकाळी लातूरचे काही कार्यकर्ते आले होते, ते म्हणाले की, लातूर तालुक्यात मविआला विचारलं जात नाही. काँग्रेस त्यांच्यापरीने निर्णय घेतं. मग आम्ही काय करायचं.

आम्हाला आमचा काही विचार करावा लागेल

मी त्यांना सांगितलं की, तुम्ही जयंत पाटील यांच्या कानावर घाला.
तसेच बाकीच्यांनी निर्णय घेऊन एकदा त्यांना सांगा की,
तुम्ही आम्हाला बरोबर घेणार नसाल तर शेवटी आम्हाला आमचा काही विचार करावा लागेल.
आम्ही इतरांना पुढे घेऊन जायचं का असा प्रश्न काँग्रेसला विचारण्यास सांगितल्याचे पवार यांनी सांगितले.

भाजपसोबत लढायचं असेल तर… – नाना पटोले

मी काहीही चुकीचे बोललो नाही. भाजपसोबत लढायचं असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल. राष्ट्रवादी जर भाजपासोबत स्थानिक पातळीवर बाजार समिती निवडणूकीत एकत्र आली तर ते चुकीचं आहे आणि त्या विरोधात मी बोलणारच, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

दरम्यान, अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या दाव्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले,
कुणाच्या मनात काय आहे हे माहिती नाही पण अजित पवार तसे जाणार नाहीत,
असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

Web Title :-  Maharashtra Politics News | ncp ajit pawar answer congress nana patole allegations of alliance with bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया