Maharashtra Politics News | महाविकास आघाडीत बिघाडी? ‘इच्छा असेपर्यंत मविआत राहू’ संजय राऊतांच्या विधानावर शरद पवार, अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडी? अशी चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याला कारण म्हणजे ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेले विधान. महाविकास आघाडीत शक्य आहे तोपर्यंत राहू त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं विधान संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलताना केले. तर दुसरीकडे सामनामध्ये आमचं मोदी शहा यांच्याशी भांडण नसल्याचे म्हणत पुन्हा एकदा भाजप (BJP) नेतृत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न साधला आहे. (Maharashtra Politics News) त्यामुळे ठाकरे गट मविआत राहणार की जुन्या युतीत सहभागी होणार या चर्चांना उधाण आले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेच्या (Shivsena) राज्यव्यापी शिबीरात बोलताना संजय राऊत म्हणाले, आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पिक आलाय. माझ्यासमोरही एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत आहोत तोपर्य़ंत. (Maharashtra Politics News) ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यमान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केलं असते, असे राऊत म्हणाले.

 

काय म्हणाले शरद पवार?

आमच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आहे, हा विषय आज आमचा नाहीच. आज हे राज्य आणि देश पातळीवर भाजपला दूर कसं करता येईल,
यावर अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे आज राज्यात कोण येईल, हा विषय सध्या नाही, असे शरद पवार म्हणाले.

 

…तेव्हा 25 वर्षे टीकेल असं वाटत होतं

बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
आजच्या घडली तिघे एकत्र आल्याशिवाय भाजप आणि शिंदे गटाचा मुकाबला करु शकत नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी 25 वर्षे टीकणार आहे. तेव्हा 25 वर्ष टीकेल असं वाटत होतं.
आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय, असं अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | ncp leader ajit pawar on sanjay raut mahavikas aghadi comment thackeray group meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने प्रचंड खळबळ

Amey Khopkar On Shishir Shinde | ‘शिशीर काका, बस करा हो आता हे धंदे…’ अमेय खोपकरांकडून खोचक सल्ला

Pune Crime News | जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा