पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | भाजपचा (BJP) विचार करुन राष्ट्रवादीचा (NCP) दुसरा गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजलं आहे. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत जाणार असे वक्तव्य करणे हे किती हास्यास्पद आहे. जेव्हा अजित दादांवर भाजपचा लहान नेता बोलतो, तेव्हा हे काहीच बोलत नाही. उलट भाजपला मोठं करण्याचे काम करत आहेत, अशा शब्दात रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते शनिवारी (दि.23) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. रात्री पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. (Maharashtra Politics News)
माझ्यावर बोलताना सर्वजण उड्या मारतात पण…
माझ्यावर बोलताना सर्वजण उड्या मारतात. पण अजित दादांवर ज्यावेळी भाजपचा लहान नेता बोलतो त्यावेळी मात्र सर्वजण गप्प बसतात. कारण भाजपला त्यांना खुश करायचं आहे. तसेच आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नसून ते हास्यास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले. (Maharashtra Politics News)
सध्या ब्लॅकमेलिंगचे काम सुरु
रोहित पवार पुढे म्हणाले, निधी वाटप करताना ब्लॅकमेलिंगचे काम सध्या सुरु असल्याचे दिसत आहे. हे चुकीचे असून आतापर्यंत कधीच असं झालेलं नाही. सत्तेसाठी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या जवळचे नेते तिकडे गेले त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही आता संघर्षाची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
नार्वेकर भला माणूस पण…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे भला माणूस आहे.
पण त्यांच्यावर दबाव असू शकतो. त्यामुळे त्यांना दिल्लीला जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena)
फुटीचा निकाल शिंदे गटाविरोधात (Shinde group) घेणार नाहीत. न्यायालयाकडून निकाल लागला असे प्रयत्न सुरु असल्याचे रोहित पवारांनी यावेळी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune News | लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची पुणे अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका