Maharashtra Politics News |  खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध, NCP चे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News |  महाराष्ट्राशी गद्दारी करुन करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात (Shinde Group) राष्ट्रवादी आक्रमक झाला आहे. येत्या 20 जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे. (Maharashtra Politics News)

खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता मिळवलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेल आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, राष्ट्रवादी काँग्रेस खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. (Maharashtra Politics News)

महाराष्ट्राशी (Maharashtra) गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक
झाला आहे. येत्या २० जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल.
या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे.
यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा
निषेध व्यक्त करावा.

शिंदे सरकार (Shinde Government) हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला
उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, शहराच्या प्रमुख ठिकाणी या
खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे.

Web Title :  Maharashtra Politics News protest against cm eknath shinde and the government on june 20 ordered by ncp state president jayant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye | ‘आम्ही ऐकतोय, शरद पवार पंतप्रधान होतील, कधी झाले, आम्ही नाही पाहिले’, केशव उपाध्येंचा टोला

Actress Ameesha Patel | वॉरंट जारी होताच अभिनेत्री अमिषा पटेलची तोंड झाकून न्यायालयात हजेरी; ‘हे’ आहे प्रकरण

Maharashtra Politics News | ‘2024 मध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचं, हा अजेंडा ठरला होता’, बावनकुळेंचा मोठा दावा (व्हिडिओ)