Keshav Upadhye | ‘आम्ही ऐकतोय, शरद पवार पंतप्रधान होतील, कधी झाले, आम्ही नाही पाहिले’, केशव उपाध्येंचा टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – दर चार वर्षांनी आम्ही ऐकतोय की शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान होतील. कधी झाले, आम्ही पाहिले नाही. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, ‘चिनू उभा राहिला, कुणी नाही पाहिला…’ तशी पवारांची गंमत आहे. त्यांना कधी दोन अंकी खासदार (MP) निवडून आणता आले नाहीत, असा टोला भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी राष्ट्रवादीला (NCP) लगावला. भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क से समर्थन’ उपक्रमांतर्गत सुरू असणाऱ्या ‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने आज नाशिक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केशव उपाध्ये (Keshav Upadhye) बोलत होते.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, आम्ही हरलो तरी ईव्हीएमला (EVM) दोष देत नाही. 2024 साली नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमतात सरकार येईल. राज्याची आणि केंद्राची निवडणूक यात फरक असते. कर्नाटकमधील पराभवाची कारणमीमांसा केली जाईल. 2018 साली देखील काही राज्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र 2019 साली प्रचंड बहुमतात विजयी झाल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.

https://www.facebook.com/photo/?fbid=804108717954610&set=pcb.804108767954605

फडणवीसांच्या काळात एकही दंगल झाली नाही

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी जातीय दंगलीविषयी पत्र लिहिले आहे. वास्तविक इतिहास तपासून पहा, या दंगलीचा कोणाला फायदा झाला आहे. याचा इतिहास जयंत पाटील यांनी बघावा. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना पाच वर्षात एकही दंगल झाली नाही. सत्ता गेल्यामुळे तडफड सुरु आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात मोर्चे सुरु आहेत, यावर उपाध्ये म्हणाले, सरकारकडे विश्वास वाटत असल्याने लोक संघटीत होत असतील तर त्यांचे स्वागत करायला पाहिजे.

800 योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

उपाध्ये पुढे म्हणाले, शासन व्यवस्थेला सुशासन पद्धतीने बदलण्याचे काम या नऊ वर्षात झाले. जवळपास 800 योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान उंचावली. सबका साथ, सबका विकास फक्त भारता पुरते मर्यादित राहिले नाही. कोरोना काळात जागतिक स्तरावर नेतृत्व मान्य करण्यात आले. 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्यात आले. भ्रष्टाचार मुक्त शासन या देशातील जनता अनुभवत असल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Web Title : Keshav Upadhye | reaction of bjps keshav upadhyay on sharad pawar becoming prime minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Asha Parekh | सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना अडकल्यामुळे 16 तास प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही ; वाचण्याची नव्हती शक्यता

Actress Ameesha Patel | वॉरंट जारी होताच अभिनेत्री अमिषा पटेलची तोंड झाकून न्यायालयात हजेरी; ‘हे’ आहे प्रकरण

Pune PMC – Katraj Dog Park | नियोजित डॉग पार्कमुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला अडथळा?