Maharashtra Politics News | राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता जाहीर, बाळासाहेब थोरात म्हणाले- ‘अशा प्रकारे विरोधी पक्षनेता जाहीर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | रविवारी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ (DyCM Oath) घेतल्याने राजकीय वतर्तुळात खळबळ उडाली. यानंतर अजित पवार यांनी 40 हून अधिक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट (NCP Political Crisis) पडल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics News) दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर काँग्रेस (Congress) हा मविआमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर (Opposition Leader) दावा केला आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता झाला पाहिजे, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती केल्याचं जाहीर केलं. यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, अशा प्रकारे विरोधी पक्षनेता जाहीर करता येत नाही. शेवटी ज्यांचं विधानसभेत (Legislative Assembly) संख्याबळ जास्त आहे. आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होतो. याबाबत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चर्चा होईल. तसेच सध्या काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता झाला पाहिजे, असे थोरात यांनी सांगितलं. (Maharashtra Politics News)

थोरात पुढे म्हणाले, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे सदस्य तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा महाविकास आघीडीवर परिणाम होणार नाही, उलट महाविकास आघाडीमधील वज्रमुठ अधिक पक्की होणार आहे, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवला.

या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते व मंत्री यांच्या उपस्थित अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram), आदिती तटकरे (Aditi Tatkare), संजय बनसोडे (Sanjay Bansode), अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Maharashtra Politics News)

Web Title : Maharashtra Politics News | split in ncp congress has claimed the post of opposition leader balasaheb thorat said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा