Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर; पुण्यातील कार्यक्रमास लावणार उपस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यातील सत्तानाट्यानंतर बहुदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे एकाच मंचावर येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (VSI Pune) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते यावेळी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)

 

उद्या (दि.२१) सकाळी अकरा वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा संस्थेच्या मांजरी येथील कार्यालयात होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil), संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळाचे सदस्य, संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच साखर उद्योगातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. (Maharashtra Politics)

शिक्षक व पदवीधर निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती काही दिवसांपासून बदलली आहे.
विद्यमान सरकारच्या काळात अनेक उद्योग राज्यातून बाहेर जात आहेत.
असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
त्यावर आता हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असून त्या विषयावर काय बोलतात. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | sharad pawar chief minister eknath shinde together on the same platform on the occasion of annual general meeting of vasantdada sugar institute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना