Maharashtra Public Service Commission | MPSC चा मोठा निर्णय, ‘या’ परीक्षा होणार ऑफलाईन पद्धतीने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Public Service Commission | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या या परीक्षा आता पारंपारिक (ऑफलाइन) पद्धतीने घेण्याचा निर्णय एमपीएससी कडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे. (Maharashtra Public Service Commission)

एमपीएससीने या निर्णयाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दिली आहे. एमपीएससीने जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेतली जाणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु प्रशासकीय कारणास्तव त्या नियोजनात बदल केला आहे. आता या दोन्ही परीक्षा पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) घेतल्या जातील. (Maharashtra Public Service Commission)

या दोन्ही परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच पदसंख्या, आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्यासंदर्भातील तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही एमपीएससी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

https://x.com/mpsc_office/status/1702301905035411930?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA