Pune Police MCOCA Action | खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | कचरा अंगावर उडाल्याच्या कारणावरुन एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या खडकी येथील शाहरुख उर्फ सुलतान कासीम बागवान व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

याबाबत भूषण रामचंद्र पांगुडवाले (वय-40 रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टोळी प्रमुख शाहरुख उर्फ सुलतान कासीम बागवान (वय-26 रा. खडगी बाजार, खडकी), मोहसीन कासीम बागवान (वय-23 रा, दर्गा वसाहत, खडकी) आणि एका अल्पवयीन मुलावर आयपीसी 307, 34, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हा प्रकार 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दर्गा वसाहत येथे घडला होता. (Pune Police MCOCA Action)

फिर्यादी हे त्यांच्या दुकानासमोर झाडू मारुन साफ करीत असताना त्याचा कचरा आरोपी शाहरुख याच्या अंगावर उडाला. याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तर शाहरुख याने धारदार कोयत्याने वार केला. त्यावेळी तो वार फिर्यादी यांनी हातावर झेलला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आरोपी शाहरुख याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या मानेवर, पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर आरोपींनी हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. (Pune Police MCOCA Action)

आरोपी शाहरुख हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. या टोळीने आर्थिक फायदा व इतर फायद्यासाठी संघटीत गुन्हे केले आहेत. आरोपींनी दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे, हिंसाचार करण्याची धमकी देणे, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी परिमंडळ-4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शिशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Sr PI Rajendra Sahane), पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, पोलीस उप निरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर सर्वेलन्स अंमलदार राजकिरण पवार, रमेश जाधव यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध
व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 61 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन