नितीन गडकरींच्या कारची तपासणी न करताच PUC दिला, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कारचे बनावट प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गाडीची तपासणी न करताच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्राविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये हा FIR नोंदविण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांची गाडी न तपासताच प्रदूषण नियंत्रण केंद्राने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की नितीन गडकरी यांच्या कारचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नियम व कार्यपद्धतीचे पालन न करता बेकायदेशीरपणे बनविण्यात आले होते.

१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या दंडाची रक्कम १० पटीने वाढली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या चलन कापण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसले तरी दंड केला जात आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण केंद्रात गर्दी होत आहे.

चलनांच्या रकमांचे वाढते विक्रम :
नवीन कायदा लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीपेक्षाही अधिक चलनाच्या पावत्या करण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या संबलपूरमध्ये एका ट्रकचे ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचे चलन काढण्यात आले. हा ट्रक नागालँडचा होता. ट्रक मालकाने जुलै २०१४ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत कर भरला नाही. याशिवाय ट्रककडे परमिट, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि विमादेखील नव्हते.

Visit – policenama.com