Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | “अलिबाग – रोहा दरम्यान (Alibag – Roha Road) रस्त्याचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेले आहे. या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. तसेच या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे”, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  यांनी विधानपरिषदेत दिले.

अलिबाग -रोहा रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटदार कंपनीने गैर व्यवहार केल्याबद्दल तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी उपस्थित केला होता.

मंत्री चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) म्हणाले की, अलिबाग – रोहा रस्ता
पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता आहे.
यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देखील घेतल्या आहेत.
लोकहिताच्या कामांमध्ये कोणाकडून अडथळा आणल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने विधानपरिषद सदस्य सर्वश्री कपिल पाटील (Kapil Patil), अनिकेत तटकरे
(Aniket Tatkare), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी
उपप्रश्न विचारले.

Web Title :-  Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | Alibag-Roha road work will be completed on time – Public Works Minister Ravindra Chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण ! आमदार अनिल भोसलेंचा चौथ्यांदा जामीन फेटाळला

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार

Maharashtra Minister Sanjay Rathod On Matang Samaj | मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

MLA Aaditya Thackeray | कॅगच्या अहवालावरुन आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल तर…’