Maharashtra Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Rain | आगामी दोन दिवसांत पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून (Monsoon Rain) सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस (Maharashtra Rain) पडू शकतो. आज विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट – Yellow Alert) देण्यात आला आहे.

येत्या आठवडाभर पुण्यात आकाश ढगाळ राहणार असून, सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

आज पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain)

मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, गुणा, सिधी, रांची ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. वायव्य राजस्थानपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे गुजरातमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे.

सध्या राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.
तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Low Weight | वजन कमी झाल्याने सुद्धा वाढू शकतात आनेक समस्या, ऑस्टियोपोरोसिस, अ‍ॅनीमियासह होऊ शकतात हे 5 रोग